Please enable Javascript...

भविष्यातील नियोजन | संस्थेविषयी | कृषि उत्पन्न बाजार समिती, सुरगाणा
रोजचा बाजारभाव

१) भात तालुक्यातील मुख्य पिक आहे त्याचेच लिलाव करून बाजार समितीचा  विकास होऊ शकतो . त्यासाठी  सर्व प्रथम बाहेर खरेदी करणाऱ्या खरेदीदारांना बाजार समितीचा आवारात खरेदीसाठी   शेड करून द्यावे लागणार आहे.  खरेदी केलेला शेतमाल त्याच दिवशी व्यापारी पुढे विक्री साठी पाठवत नाही कारण माल पुढे पाठवण्यात येणाऱ्या वाहनातील क्षमते नुसार माल खरेदी झाल्यावर गाडी लोड करतात त्यामुळे त्या मालाला काही दिवस सरक्षण गरजेचे असते त्यात उन ,वारा ,पाऊस,भटकी जनावरे चोर व इतर उपद्रवी घटकां पासून सरक्षानासाठी  सर्व खरेदी दारांना शेडची सुविधा  पुरवणार आहे.

२)  बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात आंबा, स्ट्रॉबेरी, शिमला मिर्ची,घेवडा, वाल,टोमाटो, कांदा अश्या प्रकारच्या नगदी शेतमाल व सफेद मुसली सारख्या औषधी पिकांकडे शेतकरी हळू हळू वळत आहे त्यामुळे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात उपबाजारास जागा भाडे तत्वावर घेऊन त्यावर सर्व महत्वाच्या मुलभूत सुविधा देऊन  भविष्यात त्यापासून बाजार समितीचा विकास होण्यास  मदत होईन व शेतकाऱ्याना पण हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल.

३) बाजार समितीच्या कार्यक्षेत्रात भात व वरई (millet) चे पिक मोठ्याप्रमाणात घेतल्या जाते त्यांच्या मुल्यवर्धानासाठी त्या शेतमालावर प्रक्रिया करणारी यंत्र बसवून शेतकऱ्यांच्या मालाला जास्त भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे    ( वरई साठी भगर मिल,भातापासून पोहा व मुरमुरे ची मिल, साधा व उकडा तांदूळ बनवण्याची मिल,ई.)

४) स्ट्रॉबेरी च्या निर्याती साठी बाजार समिती स्तरावरून  स्तरावरून प्रचार व प्रसिद्धी करणार आहे.

५) धान्य चाळण यंत्र  बाजार समितिच्या आवारात उभारून  शेतकऱ्यांचा फायदा  व पर्यायाने बाजार समितीचा विकास होईल.