Please enable Javascript...

कृषि उत्पन्न बाजार समिती, सुरगाणा
रोजचा बाजारभाव

दिंडोरी बाजार समिती विभाजणातून सुरगाणा बाजार समितीची स्थापना २७ मार्च २००३ मध्ये करण्यात आली. सुरगाणा हा नाशिक जिल्ह्यातील गुजरात सीमेलगतचा  डोंगरदऱ्या असलेला अदिवासी बहुल तालुका आहे. डोंगराळ भूप्रदेशामुळे  खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो, त्यामुळे इथे मुख्य पीक म्हणून भाताची लागवड केली जाते. त्या नंतर  वरई, तुर, उडीद, भुईमूग, नागली, हरभरे , गहू इत्यादी शेतमाल काही प्रमाणात लागवड केल्या  जातो. गुजरातच्या सीमेजवळ काही ठिकाणी आंबा लागवड करतात. तसेच सापुतारा पट्ट्यामध्ये स्ट्रॉबेरी व टमाटा लागवड करतात. संपूर्ण आदिवासीबहुल  तालुका  असल्यामुळे येथे शासनाची एकाधिकार खरेदी योजना लागू आहे. (महाराष्ट्र जनजातीची अर्थीक स्थिती सुधारणे अधिनियम १९७६)

हि योजना लागू असणाऱ्या ठिकाणी ह्या योजनेतील नियमन केलेला शेतमाल इतर कोणीही शासनाशिवाय खरेदी करू शकत नाही असी तरतूद त्या कायद्यात केलेली आहे. भातासह सुरगाण्यात लागवड होणारी इतर सर्व पिके त्यांच्या नियमनात आहे, सुरगाणा तालुक्यात एकाधिकार व आधारभूत धान्य खरेदी योजनेच्या माध्यमातून भाताची खरेदी महाराष्ट्र राज्य सह.आदि.विका.महामंडळ मर्या.नाशिक, यांच्यासाठी उपप्रादेशिक व्यवास्थापक  महाराष्ट्र राज्य सह.आदि.विका.महामंडळ मर्या.नाशिक उपप्रादेशिक कार्यालय सुरगाणा यांच्याकडून खरेदी केल्या जाते.

अधिक वाचा

अभिप्राय